गावाचा विकास झाला, तर शहरांनादेखील लाभ होणार आहे. हा समतोल साधायला हवा, ही माझी भावना आहे!
ज्येष्ठ पत्रकार मनोहर सप्रे यांचं ‘होल्टा : आठव, अनुभव, अनुभूती’ हे आत्मकथन नुकतंच सदामंगल पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालंय. हे पुस्तक रूढार्थानं आत्मकथन नाही. कोकणातल्या एका निसर्गरम्य गावी जन्मलेल्या लेखकाला लहाणपणी पुण्यात यावं लागलं, पण त्याची वयाच्या सत्तरीतही गावाची ओढ कमी झालेली नाही. हिरवीगार झाडं, माती, नदी, आणि गावाचा तो चिरपरिचित निर्मळ, नितळ वास.......